🕒 1 min read
दुबई- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सने पराभव केला आणि पाचव्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा याने 68 धावांची अर्धशतकीय खेळी केली, तर गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट याने 3 बळी घेतले. बोल्टला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दरम्यान,या वर्षी विजयी झालेल्या मुंबई इंडियन्सला बक्षिसाची रक्कम केवळ दहा कोटी रुपयेच मिळाली. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ 6.25 कोटी रूपयांची बक्षिसी रक्कम मिळाली.आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा संघ होता. तर विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चौथ्या क्रमांकावर होता. या दोन्ही संघाना प्रत्येकी 5 कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम देण्यात आली.
भारत आणि चीन यांच्यात झालेल्या सीमावादानंतर चिनी कंपनी विवोकडून आयपीएलचं टायटल सॉन्सर काढून घेण्यात आलं तसेच कोरोनाचा देखील मोठा फटका यंदा बसला असून यामुळेच बीसीसीआयला मोठं नुकसान झालं. त्यामुळेच बीसीसीआयच्या वतीने यावर्षीच्या बक्षिसाच्या रक्कमेत 50 टक्के कपात करण्याची घोषणा केली होती.
याआधी आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये दिले जात होते. तर उपविजेत्या संघाला 12.5 कोटी, तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रत्येकी 10 कोटी रुपये देण्यात येतात.
महत्वाच्या बातम्या
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त, योजना मात्र निरंतर सुरु
- वाढदिवशी फोटो पोस्ट केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मिलिंद सोमनच्या पुन्हा नवीन लुकची चर्चा…
- ‘या’ खास निमित्ताने सोशल मीडियावर दीपिकाने बदललं आपल नाव…
- ‘नाईक कुटुंबियांबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं’
- ‘औरंगाबादचं नाव बदलण्याने काय साध्य होणार, अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं’ – कोल्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
