Share

मुंबई इंडीयन्स सुर्यकुमार-ईशानला रिटेन करु शकत नाही, कारण…

Published On: 

नवी दिल्ली : बरीच प्रतीक्षा केल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सचे फलंदाज सूर्य कुमार यादव आणि ईशान किशन यांना टीम इंडियाची कॅप घालण्याची संधी मिळाली. इशान किशन आणि सूर्य कुमार यादव यांनी इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या टी -२० सामन्यात पदार्पण केले आहे.  या दोघांच्या पदार्पणामुळे त्यांची आयपीएल टीम असलेल्या मुंबई इंडियन्सच्या डोकेदुखीत वाढ होणार होती. हे दोन्ही खेळाडू यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या जर्सीत शेवटचं दिसण्याची शक्यता होती .

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत दहा टीम सहभागी होणार असून या आयपीएल पूर्वी मेगा ऑक्शन  होणार असल्याचं बीसीसीआयनं यापूर्वीच जाहीर केलं आहे. आयपीएल ऑक्शनच्या सध्याच्या नियमाप्रमाणे प्रत्येक आयपीएल फ्रँचायझी तीन खेळाडूंना रिटेन करू शकते.

यानंतर हे स्पष्ट झालं की मुंबई इंडियन्स पुढच्या वर्षी सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना रिटेन करु शकत नाही. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन  यांनी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्याबरोबरच ते आता भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू झाले. किशनने 56 रन्सची शानदार खेळी केली.

तर सूर्यकुमारला खेळ दाखवण्याची संधी मिळाली नाही. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी डेब्यु केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या आहेत. पुढच्या वर्षी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनसुद्धा आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त इतर संघांकडून खेळताना दिसू शकतात. कारण पुढच्या वर्षीच्या आयपीएलसाठी भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय मेगा ऑक्शन आयोजित करण्याच्या तयारीत आहे.

जर मुंबई संघाला हे दोन्ही खेळाडू पुन्हा त्यांच्या टीममध्ये घ्यायचे असतील तर मोठा मोबदला द्यावा लागेल. कारण काही अन्य फ्रॅन्चायझीदेखील या खेळाडूंना आपल्या लिस्टमध्ये घेऊ इच्छित आहेत. आयपीएल 2022 चा मेगा लिलाव डिसेंबर 2021 मध्ये होणार आहे. त्यावेळी काय होणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!