Share

मुंबईत रात्रीपासून पावसाचा जोर वाढला ; अनेक भागांत गुडघाभर पाणी

Published On: 

मुंबई : हवामान खात्याने कालच राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. आता तो अंदाज खरा ठरताना पहायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र पावसामुळे थैमान घातल्याचं दिसत आहे. गेल्या महिन्यापासून दांडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍लर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसामुळे कांदिवली परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचले असल्याचे पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे जळगावातील चाळीसगाव तालुक्यात पावसामुळं हाहाकार माजला आहे. जवळपास 800 जनावरं या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाच ते सात लोकंही वाहून गेल्याची भिती आहे. चाळीसगाव तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

जळगाव शहर आणि ग्रामीण भागात पहाटे पावसाची कोसळधार पाहायला मिळाली. तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठा पूर आला. या पुराचं पाणी जवळपास 15 गावांमध्ये शिरलं आहे. मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!