Share

जानेवारी महिन्यात कोरोनावरची पहिली लस देण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री

Published On: 

नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात ,कोरोनावरची पहिली लस देण्यात येईल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. ही लस देताना तज्ञांशी चर्चा करून पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांची निव़ड करण्यात आली असून यात पोलीस, लष्कर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लसींची सुरक्षितता आणि परिणामकारकतेला आपलं प्राधान्य असून याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान भारतात दिली जाणारी कोरोनाची लस ही जगातील इतर देशांनी तयार केलेल्या लशींइतकीच प्रभावी असेल , अशी ग्वाही आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. लस घेतल्यानंतर सौम्य ताप आणि लस दिलेल्या ठिकाणी वेदना असे त्रास होण्याची शक्यता आहे, मात्र हे सर्वच लसींच्या बाबतीत घडतं. लशीकरणाच्या मोहिमेत या परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व राज्य सरकारांना देण्यात आल्याचंही , आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान,ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळल्याने इतर सर्व देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणारा करोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. करोनाचा नवा प्रकार अद्यापही अनियंत्रित झालेला नसून योग्य उपाययोजना करत तो रोखला जाऊ शकतो असं आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!