औरंगाबाद: महाराष्ट्र सरकारने कृषी पीक म्हणून तुती रेशीम पिकाला मान्यता दिली अाहे. या संदर्भात कृषी व पशुसंवर्धन विभागाने जीआर काढला आहे. तुती रेशीमला कृषी पिकाचा दर्जा मिळाल्यामुळे रेशीम शेती करणाऱ्यांना अाता कृषी क्षेत्रासाठी लागू सर्व योजनांचा लाभ मिळणार अाहे. राज्यातील २७ जिल्ह्यांत तुती रेशीमची शेती केली जाते. या सर्व शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल.
राज्यात तुती व टसर (वन्य) अशा २ प्रकारच्या रेशमाचे उत्पादन घेतले जाते. सहकार व पणन विभागाकडून कृषी उत्पन्न पणन अधिनियमातील तरतुदीनुसार तुतीचा शेती उपजाच्या अनुसूचित समावेश करण्यास मान्यता मिळाली. नियोजन विभागाने तुतीला वृक्षाचा दर्जा दिला अाहे. कृषी विद्यापीठांत रेशीम किडे शास्त्राचा समावेश असून हा विषय व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून शिकवला जात अाहे. तुती रेशीम हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून समोर येत अाहे.
तुती लागवड शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी फायदेशीर ठरत अाहे. मात्र तुती लागवड व रेशीम उद्योगाचा समावेश वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत होता. त्यामुळे शेतीच्या विविध योजनांचा लाभ मिळत नव्हता. तुती रेशीमचा समावेश कृषी पिकांत झाल्याने हे सर्व लाभ शेतकऱ्यांना मिळणार अाहेत.
महत्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने कृषी कायदा बनवताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करायला हवा होता : राष्ट्रवादी
- धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु; भाजप महिला मोर्चाचा इशारा
- स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेतकऱ्यांवर यापूर्वी ‘अशी’ वेळ कधीही आली नव्हती : जयंत पाटील
- सरकारने आडमुठेपणाचे धोरण सोडले पाहिजे; कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून नवाब मलीकांची टीका
- तरुणांनी आपल्या देशाला…आपल्या अर्थक्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
