🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : बहिणाबाईंच्या जळगावात राजकीय वारसा लाभलेल्या पत्रकार, लेखिका मुग्धाताई चव्हाण यांचे नाव राष्ट्रवादीतर्फे आघाडीवर आहे. तसे पाहीले तर जळगाव जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा पण नंतरच्या काळात पवारसाहेबांवर जळगावने पुत्रवत प्रेम केले. पवारसाहेब सत्तेमध्ये असताना जळगाव जिल्ह्याला अडचणीच्या काळात वेळोवेळी मदत केली. जेष्ठ साहित्यीक ना.धो.महानोर, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मधुकर चाैधरी, प्रल्हादभाऊ, अरुणभाई इत्यादी नेत्यांसोबत त्यांनी कामही केले.
सध्या जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसपेक्षा मजबूत स्थितीत आहे. २००९ च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे जळगाव जिल्ह्यात ६ आमदार होते. परंतु राजकीय सुडबुध्दीतून भाजप-सेनेने जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीची संपुर्ण घडी विस्कळित करण्याचे काम केले आहे.
युतीची सत्ता असूनही रोजगार, शेती, सिंचन, उदयोग यामध्ये हा जिल्हा मागास राहिला आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळी निवडून आलेले सेनेचे सहकार राज्यमंत्री यांना मतदारसंघातील कोणताच विकास करता आला नाही ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळेच येथील जनता जुन्या चेहेऱ्यांना कंटाळून नवीन नेतृत्वास संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमका हाच प्रयोग राष्ट्रवादीकडून केला जाऊ शकतो. जळगावचे जेष्ठ नेते तसेच जळगाव जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष आबासाहेब के.डी.पाटील यांच्या नात पत्रकार मुग्धा चव्हाण यांना एक सुसंस्कृत महिला चेहरा म्हणून राष्ट्रवादीकडून संधी मिळू शकते.
राष्ट्रवादीकडे इच्छूकांची संख्या जास्त असली तरी कोरी पाटी पाहूनच विचार केला जाणार आहे. सकाळ व महाराष्ट्र टाईम्ससारख्या दैनिकांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर पत्रकारितेचा अनुभव असलेला राजकीय वारसा असणारा सुसंस्कृत चेहरा म्हणून राष्ट्रवादीकडून मुग्धाताई चव्हाण यांच्या नावावर उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब केले जाईल अशी ग्रामीण जळगावकरांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176414534333952001?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176410534016512000?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176408283583696896?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
