अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार घातला आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात ७९० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४३ हजार ३४९ एवढी झाली असून आत्तापर्यंत ३८ हजार ३६५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.५० टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७०६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. रोज ८०० ते ९०० कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालये व कोविड सेंटर सध्या फुल आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १३४, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५० आणि अँटीजेन चाचणीत ४०६ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३२, अकोले १, कर्जत ७, कोपरगाव १, नगर ग्रामीण २२, पारनेर १०, पाथर्डी १०, राहुरी २, शेवगाव ८, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर १५, कॅंटोन्मेंट १, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ६९, अकोले २, जामखेड ३, कर्जत ४, कोपरगाव ९, नगर ग्रामीण ३३, नेवासा १६, पारनेर ११, पाथर्डी १२, राहाता १७, राहुरी १६, संगमनेर १०, शेवगाव १३, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट ७ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळुन आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २३, अकोले ५१, जामखेड ३५, कर्जत ३४, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १, नेवासे ३७, पारनेर ४१, पाथर्डी १७, राहाता ३४, राहुरी ३२, संगमनेर ३१, शेवगाव २६, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १५ आणि कॅन्टोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेवासे तालुक्यातील मुळा सहकारी सुतगिरणीच्या प्रस्तावास वस्त्रोद्योग विभागाची मान्यता – शंकरराव गडाख
- परीक्षा नियोजनाचे वाजले ‘तीन-तेरा’ ; पुणे विद्यापीठाचे शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर !
- मराठवाड्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्या, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘चंद्रकांत पाटील म्हणतात पुन्हा पहाटे भूकंप होणार, त्यांनी काय गजर लावला आहे का?’
- शिर्डीत नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

