Share

#MPSC : थोड्याच वेळात मुख्यमंत्री स्वतः परीक्षेच्या तारखा करणार जाहीर

Published On: 

🕒 1 min read

पुणे : १४ मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. आणि या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले. यापूर्वीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली. याच रोषातून ‘एमपीएससी’च्या उमेदवारांनी पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व ‘एमपीएससी’चा तीव्र निषेध व्यक्त केला.

दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परस्पर तारखा जाहीर केल्या आहेत अशी धक्कादायक माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. कोरोनासंदर्भात काळजी घेण्यासाठी कमी वेळ लागेल. मुख्यमंत्री स्वतः पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे.

पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे. आजचं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना हे आंदोलन सौम्यपणे हाताळा असे सांगण्यात आले आहे. एमपीएससी परीक्षेबाबत आजच निर्णय होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!