Share

‘देवेंद्र फडणवीस पाहिजे…’ म्हणणाऱ्यांवर खासदार संजय राऊत गरजले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्य – केंद्र सरकार आणि एकूणच प्रशासन कोरोनाच्या महामारीशी लढत असताने विरोधी पक्ष भाजपची आयटी सेल मात्र महाराष्ट्राला पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे असे संदेश समाज माध्यमांवर फिरवताना दिसत आहे.

आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबद्दल विचारल असता त्यांनी अश्या लोकांना चांगलाच फटकारल आहे. ते म्हणाले अश्या संकटाच्या काळामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन खांद्याला खांदा लाऊन लढण्याची गरज आहे. एवढा शहाणपणा जर विरोधी पक्षाकडे नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात राहण्याचा अधिकार नाही.

आज महाराष्ट्राने एकसंघ राहून काम करण गरजेचं आहे. मुख्यमंत्री ज्याप्रकारे कोरोनाशी युद्ध लढताय , सर्वांना सोबत घेऊन ते अक्ख्या देशात पहिल्यांदा घडतं आहे. आम्ही स्वतः कोरोना विरुद्ध या लढ्यात देशात नरेंद्र मोदींच नेतृत्व मान्य करतो. सगळं देश त्यांच्या सोबत आहे.

आम्ही भाजप प्रमाणे म्हणत नाही कि देशाला आता नरेंद्र नी तर अमुक तमुकाची गरज आहे. तर आम्ही म्हणतो देशाला नरेंद्राचीच गरज आहे. कारण संकट काळी आम्ही देश म्हणून एक आहोत. त्यामुळे मला असा वाटत महाराष्ट्रात जे काही लोक आहेत जे असे उद्योग करताय त्यांना मोदींनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये विरोधी पक्षाने संकट काळात कस काम करायचं याच्या चिंतन शिबिरात पाठवावं असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. तसेच अश्या लोकांना क्वॉरंटाईन कण्याची गरज आहे असाही ते म्हणाले.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!