Share

निवडणुकीच्या काळात दारोदार फिरणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गेले, सुजय विखेंचा थेट सवाल

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : कोरोनामुळे राज्याची स्थिती बिकट होत चालली आहे. सरकार आपल्या परीने सर्व उपाय करत आहे. मात्र अशा अवस्थेत जनतेला त्यांनी निवडणून दिलेल्या लोकप्रतिनिधी कडून अपेक्षा आहेत. निवडणुकीच्या काळात उंबरठे झीजवणारे काही लोकप्रतिनिधी कोरोनाच्या भीतीने बाहेर यायला तयार नाहीत. त्यामुळे राज्यातील बहुतांशी जनता आपल्या ‘सेवकांच्या’ या कृतीने कमालीची नाराज आहे.

दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजप नेते सुजय विखे यांनी नेत्यांच्या नेमक्या याच चुकीवर बोट ठेवले आहे. करोनाच्या काळात आपण जनतेला मदत करत असल्याचं सांगताना विखे पाटील म्हणाले, ‘निवडणुकीच्या काळात लग्न, अंत्यविधी आणि दहाव्यालाही हजेरी लावणारे लोकप्रतिनिधी आता कुठं गेले? या काळात त्यांची लोकांना खरी गरज आहे. करोनाला घाबरून ते घरात बसले आहेत. मलाही प्रशासनाकडून जास्त न फिरण्याचा सल्ला देण्यात येत आहे, मात्र लोकांच्या मदतीसाठी आपण फिरत राहणार आहोत.

अमोल कोल्हेंना चुकीच्या पद्धतीने बदनाम कराल तर…मिटकरींचा इशारा

‘देशातील लॉकडाऊन करोना थांबविण्यासाठी नव्हे तर लांबविण्यासाठी होतं. मधल्या काळात आपली यंत्रणा सज्ज झाल्यानं रुग्णांची वाढती संख्या हातळण्याची क्षमता निर्माण झालीय. त्यामुळं आता लॉकडाउन शिथील करून इतर कामं सुरू करत करोनाला मागं टाकावं लागले,’ असे मत डॉ. सुजय विखे-पाटील यांनी व्यक्त केलं.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन शिथिल केल्यामुळं आपल्याकडं रुग्ण वाढले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.’ असं मत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर व्यक्त केलं होतं. त्यानुषंगाने पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे यांनी हे मत मांडलं. ‘डॉक्टर या नात्यानं सांगतो की, आपल्या राज्यात विशेषत: मुंबईत लोकसंख्येची घनता जास्त असल्यानं तेथे जास्त रुग्ण आढळले. मात्र, योग्य नियोजन करून हे टाळता आलं असतं. देशात लागू करण्यात आलेलं लॉकडाउन करोना थांबविण्यासाठी नव्हे तर लांबविण्यासाठी होतं. अस विखे पाटील म्हणाले आहते.

…अन् भाजपचे नाराज नेते राम शिंदे आणि रोहित पवार आले एकत्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!