Share

…अन् भाजपचे नाराज नेते राम शिंदे आणि रोहित पवार आले एकत्र

Published On: 

अहमदनगर : विधानपरिषदेत डावलल्याने नाराज असलेले भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे आणि कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी न दवडणारे राम शिंदे आणि रोहित पवार हे पुन्हा एकदा एकाच मंचावर आल्याच पाहायला मिळालं. औचित्य होत . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्याचे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडीतील तीर्थस्थळावर दोघांनीही एकत्र अभिवादन केले.

दरम्यान, राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा सामना सातत्याने रंगत आला आहे. विधानसभा निवडणुकीत या दोघांतील राजकीय स्पर्धा अधिक तीव्र झाली. कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या आखाड्यात दोघेही आमने-सामने उभे ठाकले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. राज्यातील ही लक्षवेधी अशी लढत होती. या लढाईत रोहित पवार यांनी शिंदे यांना मात देण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे या विजयानंतर राजकीय वैर बाजूला ठेवून रोहित पवार थेट शिंदे यांच्या घरी दाखल झाले होते. रोहित यांनी राम शिंदे यांच्या आईचे चरणस्पर्श करत आशीर्वादही घेतले होते. त्यानंतर या मतदारसंघातील राजकीय तणाव निवळेल असे वाटत असताना प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही.

सहा वर्षीय चिमुरडीची झुंज यशस्वी, कोरोनाला केले चारीमुंड्या चीत

राम शिंदे व रोहित पवार यांनी करोनाच्या काळामध्ये देखील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने या दोन राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये नव्याने वाद उफाळून आला होता. मात्र, आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दोघेही एकत्र आले. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी झाली. विशेष म्हणजे पवार व शिंदे यांनी एकत्रितपणे अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

मतदारसंघातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अधूनमधून झडतच आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त झालेली या दोन नेत्यांची भेट महत्त्वाची ठरली. आजच्या भेटीतून या दोघांत नव्याने संवादही सुरू झाल्याचे दिसत होते.

पंकजा मुंडेंनी दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा साधा नामोल्लेख केला नाही

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!