Share

अमोल कोल्हेंना चुकीच्या पद्धतीने बदनाम कराल तर…मिटकरींचा इशारा

Published On: 

जुन्नर : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पेटलेला आणि महाराष्ट्रभर गाजलेला अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध सत्यशील शेरकर हा वाद अखेर मिटला आहे. दोन्ही बाजूंकडून सामोपचारानं हा वाद मिटवण्यात आला आणि चक्क या दोघांची गळाभेट देखील पहायला मिळाली.

शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील शिवऋण प्रतिष्ठानचे अक्षय बोऱ्हाडे व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यातील वादावर रविवार (ता. ३१ रोजी) पडदा पडला आहे. तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांची भूमिका महत्त्वाची ठरली असून हा वाद मिटविण्यात बेनके तसेच शिरोली ग्रामस्थांना यश आले आहे.

बोऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समाज माध्यमात व्हायरल केलेल्या व्हिडीओ मुळे संपुर्ण राज्यात या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवजन्मभूमी विषयी होत असलेल्या चर्चेस पूर्ण विराम मिळावा व घरातले भांडण घरातच मिटले जावे या हेतूने आमदार बेनके यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दोघांमध्ये चर्चा घडवून आणली.

याप्रकरणी नाण्याची दुसरी बाजू तपासून पाहणेही तितकेच गरजेचे आहे. तरी, याप्रकरणात कोणावर अन्याय झाला असेल तर कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना संबंधित पोलीस खात्याला मी आधीच केली आहे, असे कोल्हे यांनी म्हटले होते. कोल्हेंच्या या सावध प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियातून कोल्हे यांना जोरदार ट्रोल करण्यात आलं.

कोल्हेंसंदर्भातील या भूमिकेवरुन विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या टि्वटर अकाऊंटवरुन कोल्हेंची बाजू घेतली आहे. शिखंडीच्या आडून बाण मारू पाहणाऱ्यांनी एक कायम लक्षात घ्यावे राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेजी महाराष्ट्रातील तमाम तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने बदनाम कराल तर भविष्यात फक्त जप करत बसावं लागेल, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हेंची बदनामी करणाऱ्यांना, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

राजकारण विसरून सगळ्यांना एकत्र येऊन काम करावं लागेल – खा. संजय राऊत

एकही केस लपवायची नाही, आपण सत्याला सामोरे जाऊ, जे आहे ते लोकांसमोर ठेऊ !

संजय राऊत यांनी सांगितले भारतात कोरोना व्हायरस आणणाऱ्या व्यक्तीचे नाव

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!