Share

खासदार संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी – तृप्ती देसाई

Published On: 

मुंबई : अभेनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना अपशब्द वापरल्याने भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली असून संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

तृप्ती देसाई म्हणल्या,  “कंगना राणौत यांनी मुंबई सुरक्षेबाबत ट्विट केलं होतं. त्यांना अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्या व्यक्त झाल्या. मात्र त्यानंतर त्यांना विरोध सुरू झाला. कंगना राणौत यांचं ट्विट चुकीचं होतं, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे”.

कंगनाला केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा , मानले अमित शहांचे आभार

तसेच यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘सत्तेत असलेल्या शिवसेनेचे आमदार राणौत यांचे थोबाड रणरागिणींच्या माध्यमातून फोडू, अशा धमक्या देतात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना राणौत यांच्याविषयी अपशब्द वापरले आणि माफी मागयाला ते तयार नाहीत. तरी तातडीनं संजय राऊत यांनी कंगना राणौत यांची माफी मागायला हवी,’ अशी मागणी देसाईंनी यावेळी केली.दरम्यान येत्या ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार असून सुरक्षेच्या कारणास्तव तिला केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. याबाबत कंगनाने गृहमंत्री अमित शाह यांचे देखील आभार मानले आहेत.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी – राधाकृष्ण विखे

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!