टीम महाराष्ट्र देशा – राज्यात आणि देशात कोरोनाचा फैलाव रोकण्यासाठी सरकारकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहे. सरकार आणि प्रशासनाकडून नागरिकांनी घरातून बाहेर पडू नका आणि गरज नसेल तर घराबाहेर फिरू नका असं आवाहन करण्यात येत आहे परंतु नागरिक रोज काहीना काही कारण काढून घराबाहेर पडत आहे.
आता सरकारकडून अधिक कडक पावलं उचलून निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या / सूचना न पाळणाऱ्या व्यक्तींवर आणि संस्थावर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना तर पोलिसांच्या लाठीचा प्रसादही खावा लागला आहे.
सरकारी कारवाईचा धाक असावा असं असलं तरी नागरिकांनी हे सर्व प्रयत्न तुमच्या सुरक्षेसाठी आहेत हे लक्षात घ्यावं असं सरकारचं आणि प्रशासनाच म्हणण आहे.
आता शिवसेना खासदार आणि सामानाचे संपादक संजय राऊत यांनी लोकांना समजवण्यासाठी एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी लोकांनी घरात राहावं असं आवाहन करतानाच तुमची चूक जीवावर बेतू शकते असंही सुचवलं आहे.
जहाँ हो •• जैसे हो ••वहाँ •• वैसे ही खुश रहना आप••
आपसे मिलना ज़रूरी नहीं ••
'आपका होना ज़रूरी है'
*Be safe*
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 24, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

