🕒 1 min read
मुंबई- श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तर दुसऱ्या बाजूला बाबरीबाबतचा खटला अद्याप सुरूच आहे. या खटल्यात आता लवकरच भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींची साक्ष नोंदविली जाणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाबरी खटला चालवण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय दिला आहे. त्यातून बाबर हा आक्रमक होता हे सिद्ध झालंय. त्यामुळे आता भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना साक्षीला बोलावणे विसंगत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी बाबरी खटला चावलणे बेकायदेशीर असल्याचाही दावा केला.
संजय राऊत म्हणाले, ‘राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने होत आहे. याचा अर्थ बाबरीचं प्रकरण निकाली लागला आहे. बाबर आक्रमक होता हे सिद्ध झालं आहे. बाबराचं आक्रमण हे बेकायदेशीर होतं हेही सिद्ध झालं आहे. यानंतरही बाबरीचा जो नवीन खटला सुरु आहे तो बेकायदेशीर ठरतो.’
महत्वाच्या बातम्या-
ही बनवाबनवी थांबवून तात्काळ कृती करा ; किरीट सोमय्यांचे राजेश टोपे यांना पत्र
जे विकेल ते पिकेल संकल्पना प्रत्यक्षात आणणार – दादा भुसे
छातीवर दगड ठेवून शासनाला हा निर्णय करावा लागला, मुश्रीफांचे अण्णा हजारेंना उत्तर
‘उद्धव ठाकरे आयोध्येला जाणारच’, राष्ट्रवादीच्या आडकाठीनंतर संजय राऊतांची रोखठोक भूमिका
उद्धव ठाकरेंचा अपमान केला जातोय, ठाकरेंच्या समर्थनार्थ कॉंग्रेस मैदानात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

