Share

ही बनवाबनवी थांबवून तात्काळ कृती करा ; किरीट सोमय्यांचे राजेश टोपे यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला करोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. त्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेणं सर्वसामान्यांना परवडत नाहीय. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारली जात आहेत. हाच मुद्दा पकडून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

खासदार किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केल आहे. किरीट सोमय्या यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून पत्रात एका रुग्णाच्या नातेवाईकाला १८ लाख रुपये बिल आकारण्यात आल्याचे उदहारण दिले आहे. त्याशिवाय रिक्षावाला, छोटया व्यापाऱ्याला लाखो रुपयाचे बिल आकारण्यात आल्याचे उदहारणही त्यांनी दिले आहे. यांनी आपल्या टि्वटमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

“खासगी रुग्णालयांकडून सर्वसामान्यांचे शोषण सुरु आहे. ही बनवाबनवी थांबवून तात्काळ कृती करा. पीपीई कीट, कोविड व्यवस्थापन आणि अन्य चार्जेसच्या नावाखाली ही महागडी बिले आकारली जात आहेत. हे असे प्रकार तात्काळ रोखण्यासाठी पावले उचलण्याची त्यांनी मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकार आणि महापालिकेला पूर्ण कल्पना आहे, त्यांनी फक्त बेड चार्जेस निश्चित केले आहेत. खासगी रुग्णालयांना अपारदर्शक, अव्वाच्या सव्वा बिल आकारायला मुभा दिली आहे, असे सोमय्या यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. त्यांनी आदेशात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

https://twitter.com/KiritSomaiya/status/1285457502063063040?s=20

कोरोना व्हायरसचा परीक्षेला पुन्हा फटका ; CA च्या परीक्षा होणार ?

आता खरी कसोटी, गाफील राहू नका, उद्धव ठाकरेंचे आवाहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!