Share

‘उद्धव ठाकरे आयोध्येला जाणारच’, राष्ट्रवादीच्या आडकाठीनंतर संजय राऊतांची रोखठोक भूमिका

Published On: 

मुंबई : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंचे नाव आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोरोनाचे संकट असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. राम मंदिर बांधून कोरोना जाईल असे भाजपवाल्यांना वाटत असेल तर हरकत नाही, अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती यानंतर चांगलेच राजकारण तापले.

भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून भाजप व महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी राष्ट्रवादीसोबतच भाजपनेही घेतली असल्याचे सांगितले जाते. यातच आता राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चक्क एक सल्ला देण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण आहे. मात्र, त्यांनी या सोहळ्याला जाणे टाळावे’, असा थेट सल्ला आता राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी दिला आहे.

अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी स्वरुपात तत्काळ नेमणूका द्या – बच्चू कडू

मेमन यांच्या विधानावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. ‘राम मंदिर हा राष्ट्रीय अस्मितेचा हा मुद्दा आहे. माजिद मेमन यांचे मत मला माहिती नाही. सरकार किमान कार्यक्रमावर चालावं असं आमच्या सरकारचा आधार आहे. हा सरकारचा अजेंडा नाही’ असं स्पष्ट केलं आहे.

‘राम मंदिर भूमिपूजनाचा शासकीय कार्यक्रम आहे. खरंतर अनेक राम भक्तांची निराशा होणार आहे. अनेक जणांना या सोहळ्याला जाता येणार नाही. अनेक नियंमांचे पालन करुन हा कार्यक्रम होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी या कार्याला गती मिळावी म्हणून प्रयत्न केला. या सरकारला 100 दिवस झाल्यानंतरही उद्धव ठाकरे जाऊन आले होते. त्यामुळे या सोहळ्याला उद्धव ठाकरे आयोध्येत जातील, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

राम मंदिराबाबत आमच्या काहीही सूचना नाही. राम मंदिराबाबत भूमिपूजन लांबवणं योग्य नाही. एकीकडे अडवाणी यांना भूमिपूजनाला चालवणे आणि त्यांच्या विरोधातच खटला चालवणे हे विसंगत आहे. तो खटला आता बेकायदेशीर आहे, असं मत राउत यांनी व्यक्त केलं.

आ. नाईक कोरोनाच्या विळख्यात ;निलेश राणे म्हणाले,रेड्याला कोरोना होऊ शकतो?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!