Share

तुम्हीच भीती आणि चिंतेची स्थिती असताना सणासुदीच स्वरूप निर्माण केलं: राऊतांचा मोदींवर घणाघात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी देशात जनता कर्फ्यूचे आवाहन सर्व नागरिकांना केले होते. त्यानुसार देशभरात काल  सकाळी ७  वाजल्यापासून जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळाला. या कर्फ्यू दरम्यान मोदींनी आज संध्याकाळी ५ वाजता सर्वांना आपल्या घरतील गॅलरीमध्ये येऊन अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन सर्व नागिरकांना केले होते.

तसेच या कर्फ्यू दरम्यान मोदींनी रविवारी संध्याकाळी 5 वाजता सर्वांना आपल्या घरतील गॅलरीमध्ये येऊन अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन सर्व नागिरकांना केले होते. यावेळी मोठ्या संख्येने देशातील नागरिकांनी टाळ्या आणि थाळी वाजवत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

मोदींनी ५ वाजता सर्वांना आपल्या घरतील गॅलरीमध्ये येऊन अत्यावश्यक सेवीतल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी टाळ्या आणि थाळी वाजवण्याचे आवाहन सर्व नागिरकांना केले होते. मात्र अनेक ठिकाणी लोक गर्दी करत रस्त्यावर उतरलेलं चित्र पहायला मिळालं.

उपमुख्यमंत्री पवार यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरून, एकत्र येऊन घंटानाद करणं अपेक्षित नाही असं अजित पवार म्हणाले.पुढे ते म्हणाले, ‘लोकप्रतिनिधींनी आणि प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रोत्साहन, प्रसिद्धी देणं टाळण्याची गरज आहे असं मत पवार यांनी व्यक्त केलं. करोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र ही गर्दी मूळ उद्देशाला धोका पोहोचवत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, रस्त्यावर उतरून गर्दी करणं टाळावं असं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं आहे. तसेच लोकप्रतिनिधी आणि मध्यामानीही अश्या गोष्टीना प्रसिद्धी आणि प्रोत्साहन न देण्याची विनंती केली आहे.

संजय राऊत यांचे टीकास्त्र –

आता शिवसेना खासदार आणि सामानाचे संपादक संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यावरून टीकास्त्र सोडलं आहे. सरकार गंभीर असेल तरच जनता गंभीर असेल असाही त्यांनी सूचित केलं. तसेच पंतप्रधानांनी भीती आणि चिंतेची स्थितीच वातावरण असताने सणासुदीचा मोहौल निर्माण केला असा आरोप केला.

ट्वीटर वर राऊत म्हणाले  ‘आमच्या पंतप्रधानांना काळजी व्यक्त केली की लोक अजूनही ‘लॉकडाउन’ गांभीर्याने घेत नाहीत.  प्रिय पंतप्रधानजी, जर तुम्हीच भीती आणि चिंतेची स्थिती असताने सणासुदीच स्वरूप  निर्माण केल असेल तर असेच होईल. जर सरकार गंभीर असेल तरच जनता गंभीर होईल. जय हिंद जय महाराष्ट्र’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!