Share

शिवसेना म्हणजे कोणतीही बच्चा पार्टी नाही, राऊतांचा दांडपट्टा सुरूच

Published On: 

मुंबई : समान सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत द्वंद सुरु आहे. शिवसेनेनं आज पुन्हा भाजप आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. सत्तेचं समान वाटप होणार असं ठरलं होतं. त्यात मुख्यमंत्रिपद येत नाही का? मुख्यमंत्रिपद हे काही एनजीओचं पद आहे का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ही रोखठोक भूमिका मांडली.मुख्यमंत्रीपदाचं समसमान वाटप व्हावं हीच शिवसेनेची भूमिका आहे. भाजपाने दिलेला शब्द पाळला पाहिजे असं राऊत यांनी म्हटलं आहे. युतीधर्माचं पालन भाजपाने करावं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना म्हणजे कोणतीही बच्चा पार्टी नाही. राजकारणात सगळ्यांना पर्याय खुले आहेत.शिवसेना लहान मुलांचा पक्ष नाही. समसमान वाटप याचा अर्थ काय? त्यात मुख्यमंत्री पद येत नाही का? भाजप नेते जर पर्याय आहे म्हणत असतील, तर सेनेकडे पर्याय नाही का? आता प्रस्ताव नाही तर थेट चर्चा व्हावी, भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी सत्तेचा दावा करावा, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

‘सामनातून’ही हल्लाबोल

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकातूनही भाजपवर टीका करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्रिपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा ‘पेच’ पडला आहे हे नक्की. जर सर्वकाही आधीच ठरले असेल तर ‘पेच’ का पडावा? आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो व मानतो. महाराष्ट्राचा वैचारिक पाया ‘धर्म’ आणि ‘नीती’ यावर टिकून आहे.

पाया विचारांचा असतो. त्यावर शिखरे उभारली जातात. आम्ही शिवरायांच्या विचाराने व शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेचा वसा घेऊन पुढे जात आहोत, मग ‘पेच’ पडोत नाही तर ‘चक्रव्यूह’ निर्माण होवोत. लढणार्यांना संकटांची पर्वा ती काय,’ असं सामन्याच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1189773709323554818?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1189777328936611840?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!