Share

भर पावसात खासदार संभाजीराजे छत्रपतींनी शेतकऱ्यांना दिला आधार

Published On: 

उस्मानाबाद : युध्द पातळीवर कॅबिनेटची बैठक घेऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उस्मानाबादेत केली आहे. संभाजीराजे छत्रपती हे उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. जिल्ह्यातील रामवाडी येथे त्यांनी भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना आधार दिला. सोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा, राजोरी, दाऊतपूर, इरला, काजळा येथील नुकसानीची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरामध्ये इरला गावातील बालाजी वसंत कांबळे हे तरूण दहा दिवसांपूर्वी वाहून गेले आहेत. ते अद्यापही ते बेपत्ता आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या कुटूंबीयांस भेट देऊन त्यांना धीर दिला. घरातील कर्त्या मुलावर अशी परिस्थिती ओढवल्याने वृद्ध आई वडील खचून गेले आहेत. घरची परिस्थितीही अत्यंत हलाखीची आहे. याबाबत त्यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या कुटूंबास धीर देण्यासाठी तात्काळ मदतीची तरतूद करावी, अशी सूचना केली.

मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना  दिलासा देण्याचा प्रयत्न खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!