Share

राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला ? ‘या’ दिवशी घेणार कमळ हाती

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- गेल्या अनेक दिवसांपसून रखडलेला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपमधील प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. येत्या बुधवारी (ता.२ ) राणे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे. मागील काही राजकीय समीकरणांमुळे हा प्रवेश अनेकदा पुढे ढकलला गेला. मात्र गरवारे हॉलमध्ये बुधवारी (ता. २) संध्याकाळी ४ वाजता राणे आणि त्यांची दोन्ही मुले नितेश राणे आणि निलेश राणे हे देखील भाजपचा झेंडा हाती घेत भाजपमध्ये प्रवेश करतील. अशी माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तीची नेहमीच चर्चा होत असते. नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय कारकीर्द अडचणीत आल्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली असल्याचे  दिसत आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी राणेंचा मुलगा  निलेश राणेंचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईकयांनी थेट राणेंचाच पराभव केला. त्यानंतर एप्रिल २०१९ च्या  लोकसभा निवडणुकीतही निलेश राणेंना हार पत्करावी लागली.  त्यामुळे राणेंच राजकारण संपुष्टात आले आहे, अशा चर्चना राजकीय वर्तुळात होत आहेत.

सलग दोन वेळा झालेल्या पराभवाने कोकणातील सत्तेवरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे.  त्यातच काँग्रेस नेतृत्वाकडून वारंवार होणाऱ्या खच्चीकरणाने त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. राणे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होते. मात्र भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेशही लांबणीवर पडत होता. आता राणे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाल्याने  राजकारणात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी  विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण हे राणेंसाठी महत्त्वाच ठरणार आहे. राज्यातील सत्तेत काही वाटा मिळवायचा असल्यास कोकणात आमदार निवडून आणणं राणेंसाठी क्रमप्राप्त ठरणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!