Share

केंद्राच्या जल योजनेत औरंगाबादचा समावेश कधी? – खा. इम्तियाज जलील

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी संसदेत शहर व जिल्ह्यातील प्रश्नांना वाचा फोडली. औरंगाबादकरांच्या पाणीप्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, केंद्राची घर घर जल योजना आहे, तरीही औरंगाबादकरांना दररोज पाणी मिळत नाही. शहरात कुठे सात दिवस, तर कुठे नऊ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, ही शरमेची बाब आहे. केंद्राच्या योजनेंतर्गत शहराला दीड-दोन वर्षांत नियमित पाणी पुरवठा होऊ शकेल का? असा सवाल त्यांनी संसदेमध्ये संबंधित मंत्रिमहोदयांना केला.

जगप्रसिद्ध जायकवाडी धरण उशाला असूनही औरंगाबादकरांच्या घशाला सरकारच्या उदासीनमध्ये कायम कोरड पडलेली आहे. एवढी वर्षे होऊनही सरकारला जायकवाडीहून नियमित पाणी उपसा करणारी यंत्रणा उभारता आलेली नाही. त्यामुळे जल मिशनमध्ये औरंगाबादचा समोवश होणार का? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला.

त्यांच्या या प्रश्नांवर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले की, 2019 मध्येच मोदी सरकारने जल जीवन योजना सुरू केली. प्रत्येक घरातील विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, त्यांना दूषित पाणी प्यावे लागू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. अशाच समस्या शहरी भागातही आहेत. औरंगाबादच्या बाबतीत बोलायचे तर शहराचा लवकरच या योजनेत समावेश करू. दीड-दोन वर्षे नाही तर येत्या वर्षातच शहरासाठी ही योजना आणण्याचे आश्वासन मंत्री शेखावत यांनी खा. जलील यांना दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!