Share

शरद पवार दिल्लीत, आज घेणार शपथ !

Published On: 

नवी दिल्ली : राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार आज शपथ घेणार आहेत. कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्रम राज्यसभेत होणार नाही तर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये होणार आहे. सकाळी ११ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे.

देशातील 20 राज्यांमधून निवडून आलेले ६२ खासदार बुधवारी शपथ घेतील. जे खासदार आज येऊ शकणार नाहीत, त्यांची अधिवेशनावेळी सभागृहात शपथ घेतली जाईल. आज शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.

सिरमच्या ५० टक्के लसी भारतीयांसाठीच, लोकांना त्या विकत घेण्याची गरज नाही; पुनावालांचा दावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शपथविधी दरम्यान सोशल डिस्टंसिंगची काळजी घेतली जाणार आहे. तसेच, जे खासदार शपथ घेणार आहेत. ते फक्त एकाच व्यक्तीला आपल्याबरोबर या शपथविधी सोहळ्यासाठी आणू शकतील, अशा सूचना निवडून आलेल्या सर्व खासदारांना आधीच देण्यात आल्या आहेत.

शपथविधीनंतर महाराष्ट्रातील आरपीआयचे रामदास आठवले, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, राष्ट्रवादीचे शरद पवार, भाजपाचे उदयनराजे भोसले हे संसदेच्या वरच्या सभागृहात दिसणार आहेत. तसेच, माजी पंतप्रधान आणि जनता दल-सेक्युलरचे प्रमुख एचडी देवगौडा दीर्घकाळानंतर राज्यसभेत हजर होतील. २०१४ ते २०१९ दरम्यान लोकसभेत काँग्रेसचे नेते असलेले मल्लिकार्जुन खड़गे यावेळी राज्यसभेत दिसतील. तर राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या आज शपथ घेऊ शकणार नाहीत.

मनमानी बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांना एकनाथ शिंदेंचा जबर दणका, कारवाईचे दिले सक्त आदेश

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!