Share

“खासदार इम्तियाज जलील बेईमान”; संजय राऊत यांची टिका..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: आपण महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे ज्या राज्यात आपण राहतो ज्या मातीमध्ये आपण खातो त्याचे ऋण फेडण्याची ही वेळ आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने मराठी पाट्यांचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) असो किंवा दुकानदार अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे आपण आपल्या मातीशी किती बेईमान आहोत हेच सिद्ध होत असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर केली आहे.

असे का होते की जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. लोक मूर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डॉलरचा प्रश्न आहे. अशी टीका औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी देखील यांच्यावर निशाणा साधला आहे.

मराठी अस्मिता टिकवण्यासाठी राज्य सरकारने मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्व दुकानांवरच्या पाट्या या मराठी भाषेतच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या दुकांनाप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले, आपण महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे या मातीचे ऋण फेडण्याची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे या निर्णयाविषयी अशाप्रकारे बोलून मातीशी बेइमानी करू नये. असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!