वाशीम : गेल्या दहा-बारा दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतकर्यांचे उडीद, मुग या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीनवरही अज्ञात विषाणुने आक्रमण केले आहे. या परिस्थीतीत पिकांच्या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी प्रशासनाला दिले आहेत.
शासकिय मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी असे ही त्यांनी बजावले आहे. गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्यांच्या शेतात काढणीला आलेले उडीद व मुग ही पिके नष्ट झालीत. यामुळे कोरोनाच्या कठीण काळात शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये मुख्य पीक असलेल्या सोयाबिनवर अज्ञात व्हायरसची लागण झाल्याने सोयाबिन पिवळे पडत आहे. ज्या क्षेत्रावर लागण झाली तेथे शेतकर्याला शुन्य उत्पन्न मिळणार आहे.
राज्यात राबविणार सशक्त क्रीडा धोरण, क्रीडामंत्री सुनील केदार यांची स्पष्टोक्ती
राज्य शासन शेतकर्याप्रती अतिशय संवेदनशिल आहे. मात्र, त्यासाठी जिल्ह्यातील प्रशासन स्तरावरून नुकसानीबाबतचे प्रस्ताव शासनाकडे जाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने युध्दस्तरावर नुकसानीचे सर्व्हे करून तसे प्रस्ताव शासनाकडे विनाविलंब पाठवावेत असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी प्रशासनाला दिले आहेत.
आनंदाची बातमी : उजनी धरण शंभर टक्के भरले…


