🕒 1 min read
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील बारा धरणांमधून उजनी धरणात ४२ हजार क्यूसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या २४ तासात उजनी धरणाची पाणी पातळी तब्बल सहा टक्क्यांनी वाढून शंभर टक्के झाली आहे. येणाऱ्या दोन दिवसात उजनी धरण ११० टक्के भरण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाला असला तरी, सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले उजनी धरण कधी भरणार? याकडे संपूर्ण जिल्हा वासियांचे लक्ष लागले होते. दरम्यान पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील वडज ४०९, डिंभे ४१२०, घोड ३१००, कळमोडी ५६१, चासकमान १८५०, आंध्रा ९४७, पवना २१६०, कासारसाई ५००, मुळशी १०३००, वरसगाव २६६५, पानशेत ३९०८, खडकवासला ११७०४ क्यूसेक्स असा एकूण सुमारे ४२ हजार क्यूसेक्सचा विसर्ग उजनी धरणात सोडण्यात आला आहे.
नगर-मनमाड महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य ; नागरिकांमध्ये असंतोष…
परिणामी उजनी धरण शंभर टक्के भरले असून धरणाची वाटचाल प्लस कडे सुरू आहे. बंडगार्डन येथे उजनीत येणारा विसर्ग २२ हजार क्यूसेक्स तर दौंड येथे हाच विसर्ग २३ हजार ८१९ क्यूसेक्स इतका आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाची पाणी पातळी ११० टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते. त्यामुळे डाव्या आणि उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी पुढे आली आहे. तसेच भीमा नदी देखील उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे
दरम्यान सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये ६०० क्यूसेक्सचा विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कपात करुन आज ३१ ऑगस्ट रोजी ४ हजार ६३७ इतका करण्यात आला असला तरी पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये कमी-जास्त असा बदल होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, तसेच नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असा ईशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
पुणे-अहमदनगर महामार्ग होणार सहापदरी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

