Share

राज्यात राबविणार सशक्त क्रीडा धोरण, क्रीडामंत्री सुनील केदार यांची स्पष्टोक्ती

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : महाराष्ट्र राज्य आज क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारात आपले अधिपत्य गाजवत आहेत. राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रच्या खेळाडूंना नावलौकिक मिळावा या करिता संपूर्ण राज्यात सशक्त क्रीडा धोरण राबविणार असल्याचे राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले आहेत.

केदार यांनी महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविण्याकरिता राज्यात क्रीडा धोरण राबविणार असून राज्यात लवकरच सर्व सुविधायुक्त क्रीडा विद्यापीठ बालेवाडी (पुणे) येथे स्थापन होणार असल्याचे सांगितले. या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू, प्रशिक्षक, पंच, आहारतज्ज्ञ व क्रीडा क्षेत्रात योगदान देणारे तज्ज्ञ घडविण्यात येणार असून त्याद्वारे राज्याचे नाव उंचाविणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

आनंदाची बातमी : उजनी धरण शंभर टक्के भरले…

कोरोना काळात सर्व खेळाडूंनी स्वत:ला सशक्त करण्याकरिता शक्यतोवर घरीच व्यायाम करावा. आपला आहार सकस ठेवावा. जेणेकरून या कोरोना महामारीनंतर खेळाडूंना आपला नैसर्गिक खेळ खेळण्यास कुठलीही अडचण जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भविष्यात मानकापूर स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल बनविण्याचा मानस असून त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही केदार यांनी दिली. यावेळी एनसीसी समूह मुख्यालयाचे प्रशासकीय अधिकारी कर्नल एस. एस. सोम, उपसंचालक क्रीडा व युवा सेवा, नागपूर विभाग अविनाश पुंड, पवन मेर्शाम उपस्थित होते.

नगर-मनमाड महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य ; नागरिकांमध्ये असंतोष…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!