🕒 1 min read
मुंबई : राज्यात काल (गुरुवारी) देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत चौदा हजारहुन अधिक नव्या बाधितांची भर पडली आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच कोरोनामुक्तांचे वाढणारे प्रमाण देखील आता राज्यासाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरत आहे. राज्यात, कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी आता ७१.३७ इतकी झाली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल राज्यात १४ हजार ४९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, १२ हजार २४३ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ४३ हजार २८९ वर गेली आहे. तसेच, दिवसभरात ३२६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. राज्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आता १ लाख ६२ हजार ४९१ असून आता पर्यंत ४ लाख ५९ हजार १२४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण कोरोना बळींची संख्या २१ हजार ३५९ वर गेली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर आता ३.३२ टक्क्यांवर गेला आहे.
कोरोनाच्या कॉलरट्यूनने नागरिक त्रस्त! कॉलरट्यून त्वरित बंद करा , मनसे नेते बाळा नांदगावकरांची मागणी
राज्यात आज 14492 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 12243 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 459124 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 162491 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.37% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 20, 2020
14,492 new #COVID19 cases, 12,243 recoveries & 326 deaths reported in Maharashtra today. Total number of COVID cases rises to 6,43,289 in the state, which includes 4,59,124 recovered cases, 1,62,491 active cases & 21,359 deaths till date: State Health Department, Maharashtra pic.twitter.com/QmEYAp1fh2
— ANI (@ANI) August 20, 2020
राज्यात आतापर्यंत ३४ लाख १४ हजार ८०९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील १८.८४ टक्के चाचण्यांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांची संख्या ६ लाख ४३ हजार २८९ इतकी आहे. दरम्यान, सद्या ११ लाख ७६ हजार २६१ नागरिक होम क्वारंटाईन आहेत, तर ३६ हजार ६३९ नागरिक हे संस्थागत (Instutational) क्वारंटाईन आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवडकरांसाठीची पीएमपीची बससेवा तूर्तास नाहीच! जाहीर केली ‘हि’ नवी तारीख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
