Share

हल्ली सभागृहात उथळपणा अधिक; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे सन्माननीय विधिमंडळ सदस्यांसाठी दिनांक ५ व ६ ऑक्टोबर, २०२१ रोजी ‘राज्याचा अर्थसंकल्प-माझ्या मतदार संघाच्या संदर्भात’ आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चक्क सभागृहा कसं बोलावं याबाबत ज्ञान दिलं आहे.

तुम्ही सभागृहात जे बोलता ते केले नाही तर लोक तुम्हाला घरी बसवतील. तसेच तुमची सभागृहातील वागणूक आणि संसदीय भाषा याचे भान असले पाहिजे. पण आता उथळपणा अधिक असतो असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न नाही पण किमान नीट बोलता आले पाहिजे,असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

सभागृहात आपण बोलावं कसं हे आपण शिकलं पाहिजे. अर्थसंकल्पाच्या भाषणात शेरोशायरी करायची, संत वचने सांगायची आणि विरोधात वागायचे मी फडणवीस यांच्याशीही बोललो सभागृहात किती हमरीतुमरी करायची, असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

पावसाची सुरुवात आपल्याकडे चक्रीवादळाने होते. प्रत्येकवेळी पंचनामे होतात. नुकसानभरपाई कशी होते ? तात्काळ मदत करावी लागते. मी खोटे बोलणार नाही. लोकांना धीर देताना उगीच काहीही बोलायचे नसते. माझ्यावर टीका झाली तरी चालेल”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!