Share

निम्म्याहून अधिक आजार खराब जीवनशैलीमुळे – राहीबाई पोपरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘लहानपणी जे गाव मी बघितले होते, तेच पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला समोरची आव्हाने बघून घाबरायला झाले, पण जिद्द होती,’ असे शेतकरी आणि पर्यावरण रक्षक राहीबाई पोपरे म्हणाल्या.

वातावरण फाउंडेशन आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फोरम-एसबीएमचा विद्यार्थी विभाग यांनी विलेपार्ले येथील स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटतर्फे आयोजित ‘एक प्रयास’ या कार्यक्रमात राहीबाई पोपरे बोलत होत्या.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘रासायनिक खाते, फवारणी, कीटकनाशक यांच्यामुळे उत्पादन तर नक्कीच वाढले आहे. मात्र, आपण अन्नात विष तयार करायला लागलो आहोत. तसेच आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी एवढ्या खराब झाल्यात की, त्यामुळेच निम्म्याहून अधिक आजार आपल्याला होत आहेत,’ असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी एवढ्या खराब झाल्यात की, त्यामुळेच निम्म्याहून अधिक आजार आपल्याला होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीचे महत्त्व आपल्याला कळायला हवे. आपण सगळ्यांनी आपल्या मुलांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!