🕒 1 min read
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या चाकूहल्ल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी ‘बाबा मला वाचव, कॉक कॉक कॉक कॉक’ अशा घोषणा देत नितेश राणेंची उडवली खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, या मोर्चानंतर कणकवलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ पोलीस उप अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) संजय मोहिते, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत काय निर्णय झाला हे समजू शकले नाही.
याप्रकरणी संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. आता नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी तीन ठिकाणी फिल्डींग लावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे. यावर भाजप नेते नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचे ते करावं, असे आव्हान नारायण राणेंनी राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी तापल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री वडेट्टीवारांकडून शिवाजी महाराजांचा अपमान; भाजपचा आरोप
- महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ‘त्या’ महाराजांविरोधात तक्रार दाखल
- …तर राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल- भारती पवार
- नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन; पंतप्रधान मोदींची ट्वीट करत श्रद्धांजली
- दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा देणारे नोबेल विजेते डेसमंड टूटू यांचे निधन


