सोयगाव : सोयगाव परिसरात सततच्या पावसाने वेताळवाडीचे धरण आठवडाभरापासून ओव्हरफ्लो झालेले असून या धरणाच्या सांडव्यातून बुडालेला बिबट्या सोना नदीच्या पात्रात वेताळवाडी गावाजवळील पश्चिम बाजूला आढळून आला. पुराच्या पाण्यात बिबट्या वाहून आल्याची घटना उघडकीस येताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे.
सोयगाव परिसरातील अतिवृष्टीचा तडाखा अजिंठा डोंगरातील वन्यप्राण्यांनाही बसला आहे. वेताळवाडी धरणाच्या खोल पाणी पातळीत पिण्याच्या पाण्यासाठी गेलेल्या बिबट्याचा तोल घसरून बिबट्या धरणात बुडाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
शहराजवळील वेताळवाडी धरण हे अजिंठ्याच्या डोंगराला लागुनच आहे.या डोंगरात वन्यप्राण्यांचा मोठा सहवास आढळून येतो. नर प्रजातीचा एक वर्षीय बिबट्या वाघ धरणाच्या सांडव्यातून वाहून वेताळवाडीच्या गावाजवळ सोना नदीच्या पात्रात मृतावस्थेत आढळून आला.
दरम्यान सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप वाघचौरे,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ,वनपाल गणेश सपकाळ आदींच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
वनरक्षक भिका पाटील,सुनील चंदवडे,गणेश परदेशी,चंद्रकांत इंगळे आदींच्या पथकाने नदी पात्रातील मृतावस्थेतील बिबट्या वाघाला नदीच्या बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतली.घटनास्थळावर पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून वनविभागाच्या वतीने घटनास्थळावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1189845120390033410?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1189842373544570880?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

