Share

मान्सून अलर्ट: मुंबई महापालिकेने केले ‘हे’ आवाहन

Published On: 

मुंबई: काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने, मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर सुरळीत होणारी मुंबई आता पुन्हा ठप्प झाली आहे. तर, हवामान खात्याने आज देखील अतिवृष्टीचा इशारा दिला असून NDRF च्या जवानांना देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, काही ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, सकाळी साडेसहा पर्यंत कुलाबा-२२० मिमी, दादर- ३०१ मिमी, सांताक्रूझ-२५१ मिमी, ठाणे १२६ मिमी पाऊस पडला आहे. आज, सकाळपासून देखील पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भागात पाणी साचून वाहतूक ठप्प झाल्याचे दिसते. माटुंगा, दादर, प्रभादेवी स्टेशनवर ट्रकच्यावर पाणी आल्याने लोकल वाहतूक बंद पडली आहे. तर, दोन लोकल दादर स्थानकात उभ्या आहेत. तसेच, गोल्डन टेम्पल एक्सप्रेस देखील दादर स्थानकात थांबवली आहे. सध्या अंधेरी ते विरार वाहतूक मात्र सुरु असल्याचे समजते.

सामना अग्रलेख: शहा रुग्णालयात असले तरी गेहलोत यांनी खुश व्हायचे कारण नाही

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता असून समुद्रास दुपारी १२:४७ वाजता भरती येणार आहे. यावेळी,  ४.५१ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.  त्यामुळे  मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावं. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्यावश्यकसेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापने इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

मान्सून अलर्ट: कोकणासह मुंबईत धुवाधार! हाई टाईडचा इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!