Share

मान्सून अलर्ट: कोकणासह मुंबईत धुवाधार! हाई टाईडचा इशारा

Published On: 

मुंबई: गेले अनेक दिवस काही प्रमाणात हलक्या सरी राज्यात पाहायला मिळत होत्या. तर, हवामान खात्याने या ३ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून मुंबईमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.  मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विविध भागात रात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. तर कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळून पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मिरारोडहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

तर आजही मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे. अनेक भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता असून समुद्रास दुपारी १२:४७ वाजता भरती येणार आहे.यातच, काल रात्रीपासून सुरु आसलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे  मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावं.

अमित शहा बरे होईपर्यंत रोजा ठेवणार; मुस्लीम नेत्याची अल्लाहकडे प्रार्थना

दरम्यान, ४.५१ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर जूनच्या सुरुवातीला राज्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण फक्त 39.82 टक्के एवढाच पाणीसाठा आहे. सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागातील धरणांमध्ये 55 टक्के एवढा असून पुणे विभागातील धरणांमध्ये नीचांकी 35.62 टक्के एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे राज्यावरील जलसंकट गहिरे झाले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साजरे केले महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!