Share

सामना अग्रलेख: शहा रुग्णालयात असले तरी गेहलोत यांनी खुश व्हायचे कारण नाही

Published On: 

मुंबई: शिवसेना पक्षाचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या ‘सामना’तून वेळोवेळी कठोर आणि सडेतोड भाषेने चालू राजकीय तसेच सामाजिक स्थितीला लक्ष्य केले जाते. आज सामना अग्रलेखातून श्री राम मंदिराच्या विषयावर प्रकाश टाकण्यात आला असून गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रकृतीवर देखील भाष्य करण्यात आले आहे. तर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना धोका कायम आहे! असा इशारा देखील देण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी, अमित शहा यांनी कोरोनाची लागण झाल्याचे ट्विटरद्वारे सांगितले होते. त्यांनतर देशभरातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. तर, गेल्या अनेक दशकांच्या संघर्षांनंतर उद्या दि. ५ ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. मात्र, ज्यांच्यावर या सोहळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्या गृहमंत्री शहांनाच कोरोनाची लागण होणे हे दुर्दैव आहे. तसेच, शहा हे एकांतवासात असले तरी राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी खुश व्हायचे कारण नाही. अमित शहा जिथे असतील तिथून ते राजकीय शस्त्रक्रिया करत असतात, असा टोला देखील सामनाच्या या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

मान्सून अलर्ट: कोकणासह मुंबईत धुवाधार! हाई टाईडचा इशारा

सामना अग्रलेखातील काही भाग-

अयोध्येतील भूमिपूजनानिमित्त धार्मिक विधी सुरू झाले आहेत. गणेश पूजनाची सुरुवात झाली असतानाच देशातील अनेक प्रमुख नेते कोरोना पॉझिटिव्हने आजारी पडून इस्पितळात दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना संसर्ग झाला. सध्या ते गुडगावमधील इस्पितळात पडून आहेत. राममंदिराच्या भूमिपूजनास ते जाणार होते. मंचावर बसणाऱयांच्या यादीत त्यांचे नाव होते असे म्हणतात. अयोध्येतील सुरक्षा तसेच इतर व्यवस्थेची जबाबदारी गृहमंत्रालयावर होती, पण गृहमंत्री साहेबांनाच कोरोनाने पकडावे, जखडावे हे अयोध्येतील सोहळ्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

अमित शहा बरे होईपर्यंत रोजा ठेवणार; मुस्लीम नेत्याची अल्लाहकडे प्रार्थना

पंतप्रधान, सरसंघचालक, उत्तर प्रदेशचे संन्यासी मुख्यमंत्री योगी महाराज व इतर निमंत्रित तर असतीलच, पण गृहमंत्री शहांशिवाय हा संपूर्ण सोहळा फिकाच पडेल. शहा यांच्या प्रकृतीस लवकरात लवकर आराम पडो, अशी आम्ही श्रीरामचरणी प्रार्थना करीत आहोत. गृहमंत्री शहा यांच्यावर कोरोनाने झडप घातली व श्री. शहा यांना एकांतवासात जावे लागले. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी खूश व्हायचे कारण नाही. अमित शहा जेथे असतील तेथून ते राजकीय शस्त्रक्रिया करीत असतात. त्यामुळे गेहलोत सरकारवरील धोका कायम आहे. गृहमंत्री एकांतवासात गेले तसे गेहलोत यांनाही त्यांच्या आमदारांना घेऊन एकांतवासात जावे लागले. म्हणजेच धोका कायम आहे!

ग्रामीण भागातील कोरोनावर मात करायची असेल तर ‘या’ त्रिसूत्रीवर काम करा – बाळासाहेब थोरात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!