Share

मोहम्मद सिराजनं मोडला १८ वर्षांपूर्वीचा विक्रम

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना. या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची भारतीय संघात निवड झाली होती. त्यामुळे तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियात होता. ऑस्ट्रेलियामध्येच असताना त्याला वडिलांच्या निधनाची बातमी कळली. त्याच्या वडिलांना दीर्घ काळापासून फुफ्फुसांचा आजार होता. बीसीसीआयने सिराजला भारतात परत येण्याचा पर्याय दिला, पण या वेगवान गोलंदाजाने टीम इंडियाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने मोहम्मद सिराजने घेतलेल्या या निर्णयाचा आदर केला आणि या कठीण काळात सिराजचे सांत्वन केले होते. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.

त्यात चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराह व आर अश्विन हे अनुभवी गोलंदाज जायबंदी झाले आणि दोन कसोटींचा अनुभव असलेल्या सिराजकडे जलदगती गोलंदाजाचे नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी आली. त्यातही न खचता त्यानं दमदार कामगिरी केली. दुसऱ्या डावात त्यानं पाच विकेट्स घेत कमालच केली. ब्रिस्बेन कसोटीत चौथ्या डावात फलंदाजी करणं सोपं नाही, याची प्रचिती चौथ्या दिवसाचा खेळ पाहताना आली. अनपेक्षित उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा कस लागला. तरीही त्यांनी टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे करण्यात यश मिळवले.

मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांनी मदत करणाऱ्या खेळपट्टीवर दबदबा गाजवताना ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. मोहम्मद सिराजनं ७३ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर शार्दूलनं ६१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर गडगडला आणि टीम इंडियाला आता विजयासाठी ३२८ धावा कराव्या लागतील.

३२ वर्षांत ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्यांदा गॅबा कसोटीत दोन्ही डावांत सर्वबाद झाला. ब्रिस्बेन कसोटीत २००३नंतर भारतीय गोलंदाजाला प्रथमच पाच विकेट्स घेता आल्या आहेत. २००३मध्ये झहीर खाननं ही कामगिरी केली होती.गॅबा कसोटीत भारतीय गोलंदाजानं केलेली ही चौथी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. १९६८मध्ये इरापल्ली प्रसन्ना यांनी १०४ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर बिशनसिंग बेदी ( ५-५५, १९७७), मदन लाल ( ५-७२, १९७७) यांनी हा पराक्रम केला होता. मोहम्मद सिराजनं आज ७३ धावांत ५ विकेस्ट घेऊन झहीर खानचा २००३ सालचा ( ५-९५) विक्रम मोडला.

score tabel

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!