Share

मोदींची पत्रकार परिषद म्हणजे ‘मौन की बात’ : राज ठाकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीतून माघार घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. आता पुन्हा राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी  झालेल्या पत्रकार परिषदेवरून टार्गेट केले आहे.

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेवरून राज ठाकरे यांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात”,असे ट्विट करत त्यांच्या काहीच न बोलण्यावर टीका केली आहे. निवडणुकीचा प्रचार संपण्याआधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेसाठी पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते. पण मोदींनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. याउलट पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद पक्षाच्या अध्यक्षांची आहे त्यामुळे मी उत्तर देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी चिमटा काढला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ऐतिहासिक व धाडसी पत्रकार परिषदेबद्दल अभिनंदन. असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!