Share

खरं बोलणाऱ्यांच्या मागे तपासयंत्रणेचा ससेमीरा लावायचा हीच मोदींची नवी लोकशाही; संजय राऊतांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आपले पंतप्रधान लोकशाही मानतात, असे गृहमंत्री अमित शहा यांना सांगावे लागले, कारण हिंदुस्थानात लोकशाही उरली आहे का ? हा प्रश्न संपूर्ण जगालाच पडला आहे. अशिक्षितांच्या हातील लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोजत आहोत हे शहा यांनीच मान्य केले. त्यामुळेच सरकारला प्रश्न विचारणे गुन्हा ठरतो. सत्य बोलणे ओझे वाटते. सत्य बोलणाऱ्यांवर धाडी घालायच्या व तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा हीच नवी लोकशाही आणि स्वातंत्र्य! अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोकठोकमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

पुढे राऊत लिहीतात, नवाब मालिक यांनी आता एक करावे, ज्यांनी हा बनाव रचला अशा हिरोगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटलेच दाखल करावेत. महाराष्ट्राची ही अशा प्रकारे यथेच्छ बदनामी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने सुरु आहे. हा मजकूर लिहीत असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शोधण्यासाठी सीबीआयने म्हणे मुंबई नागपुरातील त्यांच्या घरी धाडी घातल्या.

ही देशमुखांवरील पाचवी धाड आहे. देशमुख यांना शोधण्यासाअधी सीबीआयने परमबीर सिंग यांना शोधायला हवे. कागदी आरोप करुन परमबीर सिंग पळून गेले. त्यांना शोधा. मुंबईचे पदभ्रष्ट पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला व त्यानंतर सीबीआयपासून ईडीपर्यंत सगळेच राजकीय कर्तव्यभावनेने कामाला लागले, पण ज्यांनी आरोप केले ते पोलीस अधिकारीप परमबीर सिंग कोठे आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!