Share

मोदींची मोठी घोषणा; स्थलांतरीत मजूरांच्या रोजगारनिर्मितीसाठी देणार ५० हजार कोटी

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना विरुद्धची लढाई गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाउन जाहीर करण्यात आला. याच लॉकडाउनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतले. आता या मजूरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत.

स्थलांतरीत मजूरांसाठी केंद्र सरकारने ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केलं आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, शनिवारी २० जून रोजी बिहारमधील खगडिया गावातून होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेचे नाव ‘गरीब कल्याण योजना’ असे असून शुक्रवारी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

या योजनेचा फायदा सहा राज्यातील ११६ जिल्ह्यांना होणार आहे. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड अशा सहा राज्यांतील ११६ जिल्ह्य़ांमधील ही योजना सुरू होणार आहे. ११६ जिल्ह्य़ांमध्ये प्रत्येकी किमान २५ हजार मजूर गावी परतल्याचे केंद्राला आढळळ्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या योजनाचा लाभ २९ लाख मजुरांना होणार असून पुढील ४ महिने (१२५ दिवस) रोजगाराची हमी देणारी योजना राबवली जाणार आहे.

गरीब कल्याण योजना’ या योजनेअंतर्गत कामगारांना २५ प्रकारची कामं दिली जाणार आहे. यामध्ये अंगणवाडी केंद्र, ग्रामीण रस्ते, ग्रामीण आवास, रेल्वेची कामं, सोलार पम्पसेट, फायबर ऑप्टिक केबल पसरवण्याचं काम अशा प्रकारची कामे असणार आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

प्रवासी मजुरांना मिळणार आता पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा

PM मोदींच्या पॅकेजवर रोहित पवार म्हणतात, गुंतवणूक केंद्री नको रोजगार केंद्री अनुदान द्या

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा ; १ लाख कोटींचं पॅकेज जाहीर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!