Share

‘मोदींनी ‘तेव्हा’ अदानीला कोर्टात खेचलं होतं आणि इकडे ठाकरे सरकारने दिघी पोर्ट फुकट दिला’

Published On: 

मुंबई : कृषी कायदे आणि अन्य सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारला विरोधकांकडून लक्ष्य केलं जातं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे देखील नरेंद्र मोदी हे केवळ आपल्या उद्योजक मित्रांना मदत करण्यासाठी काही निर्णय घेतात व त्याचा फटका जनतेला बसतो असा दावा करतात.

मात्र, या तीन पक्षांचे राज्यात सरकार असताना ज्या उद्योजकांवर ते हल्लाबोल करतात त्यांच्याच कंपन्यांशी हातमळवणी केली जाते असे चित्र समोर येत आहे. याबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करून ठाकरे सरकारवर आरोप केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदी यांनी अदानी कंपनीच्या एका चुकीमुळे त्यांना न्यायालयात खेचलं होतं. मात्र, जे पक्ष अदानी यांचा राजकीय हेतूने विरोध करतात ते त्या अदानींनाच फुकट कंत्राट देतात अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

‘अहमदाबादेत विनापरवानगी गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या अदानी कम्पनीला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात सरकारने कोर्टात खेचले. सर्वोच्च न्यायालयाने अदानीला दणका देत १० लाखांचा दंड ठोठावला. इथे विरोधाची नौटंकी करणाऱ्या ठाकरे सरकारने दिघी पोर्ट अदानीला फुकट दिला. फक्त तोंडाच्या वाफा,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!