लातूर : मागील काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. काही अतिरिक्त निर्बंध लावणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी यांनी लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. सर्व हॉटेल, बार, पान टपऱ्या, चहा कॅन्टिन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
लातूर जिल्ह्यातील सर्व जिम, व्यायाम शाळा, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, योगा, नृत्यवर्ग, खेळाची मैदाने, सर्व क्रीडा प्रकारच्या स्पर्धा, वैयक्तिक क्रीडा प्रकार, सराव, स्विमिंग पूल, पार्क, अम्युजमेंट पार्क, पर्यटन स्थळे, इतर करमणुकीची ठिकाणे पूर्णत: बंद राहतील. सर्व चित्रपटगृहे, व्हिडिओ गृहे, नाट्यगृहे, व्हिडिओ गेम पार्लर, प्लेइंग कार्ड रूम, मंगल कार्यालये, सभागृह बंद असतील. जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, बार, परमिट रूम, रेस्टॉरंट या ठिकाणी बसून खाण्यापिण्यास मनाई असेल. या ठिकाणावरून केवळ पार्सल सुविधा उपलब्ध राहतील. जिल्ह्यातील सर्व पान शॉप्स, पान टपऱ्या, चहा टपऱ्या इत्यादी बंद राहतील.
२९ मार्च रोजीचा साजरा होणारा होळी, धुलिवंदन आणि २ एप्रिल रोजीची रंगपंचमी हे प्रतिकात्मक पध्दतीने आपल्या कुटुंबात घरी साजरा करायचा आहे. ऑटोरिक्षात प्रवासी संख्येची मर्यादा वाहन चालक एक अधिक दोन तसेच अधिकृत खाजगी टॅक्सीत प्रवासी संख्येची मर्यादा वाहनचालक एक अधिक पाच प्रवासी इतकी असेल.हे सर्व निर्बंध जशास तसे ४ एप्रिल २०२१ रोजीपर्यंत लागू राहतील.
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्यात शनिवारी सायंकाळपर्यंत तरी लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

