बीड: भगवान बाबांचं स्मारक त्यांच्या जन्मगावात उभारुन पंकजाताईंनी वंचित, ओबीसी समाजाला प्रेरणा आणि दिशा देण्याचं काम पंकजाताईंनी केलं. आमचं मोदी सरकार भगवान बाबांनी दाखविलेल्या मार्गावरुनच चालत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात झाला. या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सुरुवातीला काश्मीरची 370कलम पाठवल्याबद्दल 370 तोफांची सलामी व 370 तिरंगि झेंडे लावण्यात आले होते.
शहा म्हणाले, मेहनत करणार्यांना प्रगतीचा रस्ता भगवानबाबांनी बनविला होता. बाबांनी शिकण्याचा संदेश दिला. त्यातूनच वंचित आणि ओबीसी समाजाचा विकास होऊ शकतो, असे सांगितले. भगवान बाबांच्या याच संदेशाने प्रेरित होऊन गोपीनाथ मुंडे यांनी काम केले. आणि आता पंकजा हे काम पुढे घेऊन जात आहे. ऊसतोड मजुरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी पूर्ण आयुष्य वेचलं आता पंकजा त्याच मार्गावरुन चालत आहेत. भगवान बाबांच्या जन्मस्थळाला मोठं स्मारक बनविण्याची घोषणा पंकजा केली होती. तेही पूर्ण केली. आता या माध्यमातून त्याभगवानबाबांचा संदेश पुढे घेऊन जातील.
तुम्ही आम्हाला 303 जागा दिल्या आम्ही 370 कलम हटविण्याचं काम केलं. तुम्ही सर्वजण तिरंगा घेऊन आलात याचा अर्थ तुम्ही समर्थन देत आहात. ज्यांनी विरोध केला त्यांना प्रश्न विचारा की का विरोध करीत आहात? 370 हटवून पूर्ण देशाला एका धाग्यात बांधण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी सरकार भगवानबाबांनी दाखविलेल्या रस्त्याने चालण्याचे काम करीत आहे. वंचित, ओबीसी समाजाला सवैधानिक दर्जा देण्याचं काम मोदी सरकारने केलं.
तसेच मागच्या सरकारने हे आतापर्यंत का केले नाही? ओबीसी आयोग बनविण्याचं काम भाजपा सरकारने केलं. वंचित, ओबीसीच्या विकासासाठी भाजपा काम करीत आहे. आज दसरा आहे, वाईटावर विजय मिळविण्याचा दिवस आहे. मी राजकीय बोलणार नाही पण माझा पहिला महाराष्ट्रातील कार्यक्रम भगवान भक्तीगडावर होतोय ही भगवानबाबांची कृपा आहे. असल्याचे सांगत पंकजा मुंडे यांचे कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181545201522761728?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181547001541869568?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

