Share

मोदी आणि शहा एक दिवस हुकूमशहा बनतील; शेतकरी आंदोलनावरून सुशीलकुमार शिंदे संतापले

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर:- गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला देशभर पाठिंबा मिळत आहे. आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. तरीही देशाचा गृहमंत्री आंदोलन गांभीर्याने घेत नाही. त्यांच्याशी चर्चा करत नाही. खरे तर या आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी दर दोन-तीन दिवसातून एकदा चर्चा करायला हवी होती, मात्र तसे काहीच होताना दिसत नाही. मोदी आणि शहा यांचे हे वागणे असेच सुरू राहिले तर ते एक दिवस निश्चितच हुकूमशहा बनतील, असा टोला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कोल्हापुरात लगावला आहे.

दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!