Share

आमचे जगणे मोबाइलमुळे अवघड झाले – इंदुरीकर महाराज

Published On: 

🕒 1 min read

कोपरगाव : ‘केवळ एखाद्याची बदनामी करायची, ही वृत्ती झाल्याने आमच्या सारख्यांवर संकट आले आहे, अशी खंत समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या मोबाइलच्या एका क्लीकने समोरच्या माणसाचे काय होईल, याचा विचार केला जात नाही,’ अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

ते कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर आपली खंत व्यक्त केली. मुलगा -मुलगी जन्म वेळेचा दाखला दिल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी कोपरगाव येथे कीर्तनातून बोलत असताना या प्रकरणावर बाबत त्यांनी खबरदारी बाळगलेली दिसत आहे. ‘केवळ मोबाईलच्या एका क्लीपवरून व एका क्लीकने बदनामी झाल्यामुळे यापुढे कीर्तनामध्ये व्हिडिओ शूटिंग कोणाला करू देणार नाही, असा ठाम निर्धार महाराजांनी केला असावा.

दरम्यान, खिसा गरम आहे तोपर्यंत हे जग आपल्यासाठी चांगले आहे. माणसापेक्षा सध्या जगात फक्त पैशावर प्रेम आहे. माणसाकडे जास्त पैसा आला की शत्रू वाढतात. ज्यांच्याकडे पैसा कमी त्यांच्याकडे शत्रू कमी ज्यांच्याकडे पैसा जास्त त्यांच्याकडे शत्रू जास्त, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!