🕒 1 min read
मुंबई : ‘मदत किती लोकांपर्यंत पोहचली हे तपासू पाहण्यासाठी यंत्रणा उभारा म्हणजे याबाबत पारदर्शकता येईल,’ अशी सूचना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. देशपांडे यांनी याबाबत फेसबुकवर काही सूचना केल्या आहेत.
पुढे देशपांडे म्हणतात, ‘लॉकडाऊनमुळे आर्थिक मागास वर्गाच्या लोकांना अन्न-धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे. किती मदत केली याचे आकडे सरकार रोज देते पण ही मदत किती लोकांपर्यंत पोहचते हे कळायला मार्ग नाही’.
तसेच महागरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कामाचा जास्त ताण आहे. मनपाचे डॉक्टर गेले २१ दिवस सतत काम करत आहेत त्यांची काम करण्याची क्षमता संपली आहे. त्यांना विश्रांती देण्यासाठी सर्व दवाखान्यांमध्ये खाजगी डॉक्टरांची मदत घ्या,’ असं देखील देशपांडे म्हणाले आहेत.
दरम्यान, कोरोना’ला रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

