Share

मनसे आक्रमक, १२ तारखेला करणार सरकारविरोधात आंदोलन

Published On: 

मुंबई : ज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने १९ मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले होते, गेल्या २ महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊननंतर ८ जूनपासून पुनश्च हरिओम करत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे.

पहा, असं का म्हणाला सोनू सूद? ‘Chinese लोगों को डिटेल्ज़ भेजो’  

दरम्यान, अनलॉक १ सुरु झाला तरी रिक्षा, टॅक्सी इतर वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. ओला, उबेर यासारख्या वाहनांना परवानगी देत असताना रिक्षा टॅक्सी चालकांना परवानगी का नाही ? असा सवाल मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात रिक्षा टॅक्सी सुरु नसल्याने अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने रुग्णांना भाडे आकारण्यात येत आहे. तेच जर रिक्षा, टॅक्सी चालकांना परवानगी दिली तर सर्वसामान्य जनतेसाठी सोयीस्कर जाईल. कोविड १९ च्या नियमांनुसार आवश्यक सुरक्षा उपकरणे वापरुन रिक्षा, टॅक्सी सुरु करण्याची सरकारने परवानगी द्यावी. ज्या रिक्षा, टॅक्सी चालकांना शासनाने परवाना दिले आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ओला, उबेरसारख्या कंपन्यांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत नाही, रिक्षा, टॅक्सी चालकही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे काम करतात मग त्यांना परवानगी का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नाभिक समाजाच्या महिलांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या युवकाविरोधात कारवाईची मागणी

तसेच याबाबत राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला तरीही सरकारचे मंत्री रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मागणीकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या राज्य सरकारला जागं करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात वाहनचालकांनी येत्या १२ जूनला संध्याकाळी ५ वाजता एक मिनिटांचा हॉर्न वाजवून सरकारचा निषेध करणार आहोत, या आंदोलनात सर्व वाहनचालकांनी जे कोणत्याही पक्षाचे असो पण आपल्या कुटुंबासाठी सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन राज्य सरकारला हा आक्रोश दाखवून देऊ, राज्य सरकारने ही मागणी करावीच यासाठी हे आंदोलन आहे, सरकार जर रिक्षा, टॅक्सी चालकांचे ऐकत नसेल तर वाहनचालकांचा उद्रेक होईल असा इशारा मनसेचे संजय नाईक यांनी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!