रिसोड : नाभिक समाजाच्या महिलांबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातुन अपशब्द काढणाऱ्या विवेक लांबे या माथेफिरू व विकृत प्रवृत्तीच्या युवकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी दि 9 जुन 2020 मंगळवारी रिसोड येथील नाभिक समाजाच्या वतीने प्रभारी ठाणेदार गवई यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मीच भुज’बळ’… मंत्रीमंडळात माझा रुबाब मात्र टिकू दे, मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून शेलारांचा टोला
बुलडाणा जिल्ह्यातील कुल्धना येथील विवेक लंबे या युवकाने फेसबुकद्वारे नाभिक समाजाच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केल्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना निंदनीय आहेत त्या विकृत इसमावर कठोर कारवाई व्हावी याकरिता नाभिक समाज आक्रमक झाला आहे.
नाभिक समाज हा अतिशय प्रामाणिकपणे आपल्या परंपरागत व्यवसायातून सेवा करीत आला आहे परंतु लॉक डाउन च्या कालावधीत व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकटात असलेल्या समाजाला धीर देण्याऐवजी विकृत मानसिकतेचे काही भामटे चुकीची टिप्पणी करून त्यांना मानसिक दृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या अतिशय गंभीर बीबीची दखल शासनाने घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी रिसोड येथील नाभिक समाज संघटनांनी केली आहे.
कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा बोलून दाखवली तर त्यात चुकीचं ते काय ?
ठाणेदार यांनी जिल्हाधिकारी साहेब ऋषिकेश मोडक पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांचे मार्फत शासनाकडे पाठपुरावा करून नाभिक समाजाच्या तक्रारीच्या निवेदनाचा सहानुभूतीपुर्वक विचार करन्याची मागणी केली आहे. प्रसंगी दीपक दळवी, संतोष बाळे, अशोक मांदळे अमोल दळवी, रामकृष्ण, कोकाटे, माधव कोकाटे, सुनील मोरे, धनंजय दाहिरे, राजू दळवी, बबलू कोकाटे, वैभव कोकाटे, पत्रकार सतिष मांदळे, पांडुरंग वाघमारे, एकनाथ बोरुडे ,संतोष वाघमारे ,अमोल वाघमारे संदीप पवार ,जगन जाधव, गोपाल कोकाटे इत्यादी सलुन असोशियनचे व जीवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी नाभिक बांधव उपस्थित होते
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
