Share

मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही – राज ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मोदींवर टीका केली आहे, स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदींना देश कधीही माफ करणार नाही. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द ओळखली जात होती. आता त्यात भर पडली ती विधीशून्यतेची. स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, वडिलांबद्दलच्या विधानाने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी देखील नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटकरत आता युद्ध संपले असून मोदींचे कर्म त्यांची वाट पाहता आहेत, असा घणाघात केला आहे. मोदी यांनी माझ्या वडीलांमध्ये आणले तरी ते आता वाचू शकणार नाहीत, असा इशारा राहुल यांनी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!