Share

मनसेच्या निरंतर पाठपुराव्याला यश; ७१ वर्षांनी आली आदिवासी पाड्यात वीज

Published On: 

मुंबई – देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे लोटली असली तरीही विकासाची गंगा अजूनही वंचितांच्या, आदिवासींच्या दारापर्यंत पोहोचली नसल्याचं नेहमी बोललं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा.

भाईंदरच्या उत्तन – गोराई मार्गापासुन सुमारे तीन किमी आत डोंगराच्या खाली वसलेला जामझाड हा पाडा आहे. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरदेखील हा पाडा अंधारातच होता. एकाबाजूला देशात सर्वत्र वीज पोहोचविली असल्याचा दावा सत्ताधारी मंडळी करीत असताना मुंबईत असणाऱ्या या पाड्यात वीज नसल्याचं समोर आल्याले दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र होते.

अखेर स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर गोराईतील आदिवासी जामझाड पाड्यात मनसेच्या निरंतर पाठपुराव्याने वीज पुरवठा झाला आणि पाड्यातील घर अन् घर उजळून निघाले. त्यामुळे रहिवाशांनी अमित ठाकरे यांची भेट घेऊन पक्षाचे आभार मानले व प्रेमाची भेट म्हणून पिकवलेली फळं व भाजीपाला भेट दिला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून ही माहिती देण्यात आली आहे .

अदानी या वीज कंपनीने जामझाड पाड्यात वायर टाकण्याचे काम सुरू केले होते. ते या आठवड्यात पूर्ण झाले असून, आता हा पाडा प्रकाशाने उजळून निघाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!