टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदारांची माहिती ‘आधार’ला जोडावी अशी विनंती केली आहे. याची गरज काय? ह्यातील धोके काय ? याचा फायदा काय ? निवडणूक आयोगानं असं करावं का? निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे का ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदारांची माहिती "आधार"ला जोडावी अशी विनंती केली आहे .. ह्याची गरज काय? ह्यातील धोके काय? ह्याचा फायदा काय? निवडणूक आयोगानं असं करावं का? निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे का?
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) July 21, 2019
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून मतदारयादी आधार कार्डशी लिंक करावी अशी मागणी केली आहे
तर आधार कार्डची माहिती खाजगी संस्थांकडे गेल्याची माहिती आपल्याला आहे. त्यामुळे आधार आणि मतदारयादी जोडली तर ती माहिती परदेशी व्यापारी संस्थांकडे जाईल का? त्यामुळे मतदारांच्या सखोल आणि विस्तृत माहितीचा गैरवापर होईल का? मतदारांवर परिणाम करण्याचा प्रयत्न होईल का? असा प्रश्न सुद्धा शिदोरे यांनी उपस्थित केला आहे.
आधार कार्डची माहिती खाजगी संस्थांकडे गेल्याची माहिती आपल्याला आहे.. त्यामुळे आधार आणि मतदारयादी जोडली तर ती माहिती परदेशी व्यापारी संस्थांकडे जाईल का? त्यामुळे मतदारांच्या सखोल आणि विस्तृत माहितीचा गैरवापर होईल का? मतदारांवर परिणाम करण्याचा प्रयत्न होईल का?
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) July 21, 2019
तर दुसरीकडे अनेक वेळा मतदार यादीत घोळ होते तसेच बोगस मतदान झाल्याचाही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे खरा मतदार बाजूला राहतो त्याला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे मतदार यादीत पारदर्शकता यावी यासाठी जर मतदारयादी आधार कार्डशी लिंक केली तर या घटनांना आळा बसेल त्यामुळे फडणवीस यांनी मतदार यादी आधार कार्डशी लिंक करण्याची मागणी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

